Posts

Showing posts from April, 2024

Part 2 - Respect Your Own Product

English version below. मागच्या भागात मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे मी self employed झाले. मैत्रिणींमध्ये दागिन्यांची विक्री सुरू झाली. आवडीने घेत होत्या सगळ्या. मग एकदा वाटले की आता आपल्या जवळच्या सर्कल बाहेर आपले दागिने आवडतात का ते बघितले पाहिजे. आपले घर, नातेवाईक, मित्रमंडळी आपला कम्फर्ट झोन असतात. ह्यांच्याशिवाय बाहेर माझे दागिने अनोळखी लोकांमध्ये विकले गेले पाहिजेत असे डोक्यात आले. तो खरा प्रतिसाद असणार होता मी बनवलेल्या दागिन्यांसाठी. त्या वेळेस प्रदर्शनाचा पर्याय समोर आला. त्या वेळेस दिवसभराची प्रदर्शने फार व्हायची नाहीत संध्याकाळी ५ तासाची असायची. घरचे सगळे आवरून स्वयंपाक वगैरे करून जाता यायचे. लहान मुलींकरिता बायका खरेदी करायच्या. पण मोठ्यांकरिता म्हणावा तसा रिस्पॉन्स येत नव्हता. डिझाईन्स वाढवली. हे डिझाईन मी घातले असते का असा पण विचार करून बदल केले. मला स्वतःला फार मॅचिंग गळ्यातले कानातले घालणे आवडायचे नाही. आणि एक दिवस अचानक मला माझ्या दागिन्यांसाठी एक मॉडेल मिळाली!!. हीच माझे दागिने घालून बायकांना सांगू शकते आणि त्यांना पटवून देऊ शकते की क्रोशाचे दागिने घातल्यावर कसे दिस...

Part 1 - Follow Your Passion

Image
English version below. बिझनेस करताना खूप अनुभव येतात आणि त्यातून आपण शिकत जातो.दर काही दिवसांनी मला आलेले अनुभव आणि त्यातून घेतलेला धडा मी तुमच्यासमोर आणेन. पुढच्यास ठेच मागचा शहाणा ह्या वेळेस थोडीशी पार्श्वभूमी. शिक्षणानंतर बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये नोकरी मिळाली. लग्न ठरल्यावर लगेच सोडली सुद्धा. मला त्या वेळेस सगळ्यांनी वेड्यात काढले असे कसे करू शकतेस. इकडचे बॉस सुद्धा तुला US ब्रांच मध्ये देतो नोकरी म्हणाले. पण मी ठाम होते नोकरी सोडण्यावर. लग्न झाल्यावर लगेचच US वारी झाली. पण मन रमले नाही आणि माझ्या भावनांचा आदर करून नवऱ्याने भारतात परतायचा निर्णय घेतला. नंतर लगेच मोठ्या मुलाचा जन्म २००२ मधला. त्याचे करण्यात सगळा वेळ जायचा. पण जसा तो शाळेत जायला लागला तसे जाणवले की आताच इतका वेळ मिळतोय तर अजून २० वर्षांनी तर मग मी काय करणार? नोकरी करायची नाही हे तर ठरवलेच होते. मग वेळ घालवायला म्हणून सोसायटी मधल्या मैत्रिणीकडे दागिने बनवण्याचा दोन दिवसांचा कोर्स केला. सुरुवातीला छोटे छोटे सेट्स बनवायचे आणि वाढदिवसाला वगैरे मैत्रिणींना गिफ्ट द्यायचे. एका मैत्रिणीला तो गिफ्ट म्हणून दिला आणि तीच वेळ माझ्...