Part 2 - Respect Your Own Product
English version below. मागच्या भागात मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे मी self employed झाले. मैत्रिणींमध्ये दागिन्यांची विक्री सुरू झाली. आवडीने घेत होत्या सगळ्या. मग एकदा वाटले की आता आपल्या जवळच्या सर्कल बाहेर आपले दागिने आवडतात का ते बघितले पाहिजे. आपले घर, नातेवाईक, मित्रमंडळी आपला कम्फर्ट झोन असतात. ह्यांच्याशिवाय बाहेर माझे दागिने अनोळखी लोकांमध्ये विकले गेले पाहिजेत असे डोक्यात आले. तो खरा प्रतिसाद असणार होता मी बनवलेल्या दागिन्यांसाठी. त्या वेळेस प्रदर्शनाचा पर्याय समोर आला. त्या वेळेस दिवसभराची प्रदर्शने फार व्हायची नाहीत संध्याकाळी ५ तासाची असायची. घरचे सगळे आवरून स्वयंपाक वगैरे करून जाता यायचे. लहान मुलींकरिता बायका खरेदी करायच्या. पण मोठ्यांकरिता म्हणावा तसा रिस्पॉन्स येत नव्हता. डिझाईन्स वाढवली. हे डिझाईन मी घातले असते का असा पण विचार करून बदल केले. मला स्वतःला फार मॅचिंग गळ्यातले कानातले घालणे आवडायचे नाही. आणि एक दिवस अचानक मला माझ्या दागिन्यांसाठी एक मॉडेल मिळाली!!. हीच माझे दागिने घालून बायकांना सांगू शकते आणि त्यांना पटवून देऊ शकते की क्रोशाचे दागिने घातल्यावर कसे दिस...